Mumbai Gold Smuggling: मुंबई विमानतळावर ३.१५ कोटींच्या सोन्याची तस्करी; सिगारेट पाकिटांत लपवलेलं गोल्ड पाहून अधिकारीही थक्क

Mumbai Gold Smuggling: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ३.१५ कोटी रुपयांचे सोने जप्त केले.
Mumbai Gold Smuggling
Mumbai Gold SmugglingPudhari
Published on
Updated on

Mumbai Gold Smuggling: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून तब्बल ३.१५ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणांमधील आरोपींना अटक करण्यात आली असून कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना संशय आला. सखोल झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे असलेल्या सिगारेटच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवलेले सोन्याचे पेस्ट स्वरूपातील पदार्थ आढळून आले. तपासात हे १.०२ किलो वजनाचे सोने असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची अंदाजे किंमत १.४१ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यानंतर दुसऱ्या कारवाईत आणखी एका प्रवाशाकडून २४ कॅरेटचे १.२५७ किलो कच्चे सोने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, हा आरोपी फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणारा आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. या सोन्याची किंमत सुमारे १.७४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai Gold Smuggling
Raj Thackeray On PM Modi: काटकसरीची सुरुवात आधी स्वतःपासून करा; पंतप्रधान मोदींवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन-इराण संघर्ष आणि दुबईमधील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशातील मालमत्ता भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, अशी कबुली आरोपींनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai Gold Smuggling
Devendra Fadnavis | राहुल गांधी हे सगळीकडे 'रिजेक्टेड' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला असून, कर आणि इतर आर्थिक नियम टाळण्यासाठी सोन्यात रूपांतर करून तस्करीचा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे का, याचाही सीमाशुल्क विभाग शोध घेत आहे.

मुंबई विमानतळावरील या कारवाईमुळे पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला असून, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा गैरफायदा घेत भारतात बेकायदेशीररित्या संपत्ती आणण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news