Mumbai Kurla viral video: कुर्ल्यात जोडप्याला बेल्ट, काठ्यांनी बेदम मारहाण; ८ अल्पवयीन ताब्यात, धक्कादायक व्हिडिओ

मुंबईतील कुर्ला परिसरात फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात फोटो काढत असलेल्या तरुण-तरुणीची टोळक्याने छेडछाड करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai couple attacked Kurla viral video

मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात फोटो काढत असलेल्या तरुण-तरुणीची टोळक्याने छेडछाड करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० ते १२ अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांना घेरून ही मारहाण केली.

या प्रकरणी पीडित तरुण-तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि. २०) घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला होता. सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महापालिकेच्या उद्यानात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.