Burqa Controversy Mumbai Hospital: मुंबईतील रूग्णालयात बुरख्यावरून वाद... महिला वकीलांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं

Burqa Controversy Mumbai Hospital: मुंबईतील रूग्णालयात बुरख्यावरून वाद... महिला वकीलांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं
Published on
Updated on

Burqa Controversy Mumbai Hospital: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन महिला बुरखा घालून मुंबईच्या कूपर रूग्णालयात जातात असं दिसत आहे. बीएमसीकडून चालवण्यात येणाऱ्या या रूग्णालयात सुरक्षा रक्षक या बुरखा घातलेल्या महिलांशी हुज्जत घालताना दिसत आहेत.

Burqa Controversy Mumbai Hospital: मुंबईतील रूग्णालयात बुरख्यावरून वाद... महिला वकीलांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं
Burqa ban Goregaon college : गोरेगावच्या विवेक कनिष्ठ महाविद्यालयात बुरखाबंदी

सुरक्षा रक्षकांनी रूग्णालयात मुलं चोरीच्या घटना घडल्या आहेत असे सांगत बुरखा घालून या महिलांना रूग्णालयात प्रवेश करण्यास मनाई केली. हा व्हिडिओ मुंबईचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे याबबत काही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या व्हिडिओत पेशानं वकील असलेल्या जेहरा शेख या आपल्या नातवाईकांना भेटण्यासाठी कपूर रूग्णालयात गेल्या होत्या असं सांगण्यात येत आहे.

Burqa Controversy Mumbai Hospital: मुंबईतील रूग्णालयात बुरख्यावरून वाद... महिला वकीलांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं
Switzerland Burqa Ban | स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, उल्लंघन करणार्‍यांना दंड, जाणून घ्या काय आहे कायदा?

जेहरा शेख यांच्या नातेवाईकांचा कपूर रूग्णालयात उपचार सुरू आहे. जेहरा या त्यांच्या एखा मैत्रिणीसोबत आल्या होत्या. दोघींनीही बुरखा घातला होता. जेहरा आणि त्यांची मैत्रिण रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचल्या त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं.

Burqa Controversy Mumbai Hospital: मुंबईतील रूग्णालयात बुरख्यावरून वाद... महिला वकीलांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं
Samay Raina controversy : समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटंट' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, आता काय घडलं?

सुरक्षा रक्षकांनी चेहरा आणि त्यांच्या मैत्रिणीला थांबवत इथं मुलं चोरी होतात त्यामुळे तुम्ही तुमचा बुरखा उतरवण्यास सांगितलं. जेहरा यांनी यासाठी निकार दिला. त्यांनी बुरखा हटवणे हा आपल्या गरिमा आणि प्रायव्हसीचे उल्लंघन असल्याचं सांगितलं. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा देखील उल्लेख केला.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओबाबत प्रशासनाकडून अजून कोणतं वक्तव्य आलेलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news