चर्चगेट रेल्वे स्थानकात आग लागली आहेPudhari News Network
मुंबई
Mumbai Churchgate Station Fire | चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग : स्टेशनमध्ये धुराचे लोट
परिसरातील केकच्या दूकानात आग लागल्याचे समोर : आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
मुंबई : चर्चगेट स्टेशनमधीन कॅन्टिनला आज गुरुवारी सांयकाळी भीषण आग लागली आहे. या आगीमुळे चर्चगेट रेल्वेस्टेशनमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमनकडून दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घब्टनास्थळाहून मिळालेल्या माहितीनूसार स्टेशनवरील केकच्या दुकानाला ही आग लागली आहे असे समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरु होते.
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वेस्टर्न रेल्वे ची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे.

