Mumbai Tree Falls on School Bus: मुंबईत स्कूल व्हॅनवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

Mumbai Chembur Tree Collapse Incident: मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल
Tree Collapse School Van Chembur
मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.Pudhari
Published on
Updated on

Chembur Tree Falls on School bus

मुंबई : चेंबूरच्या दयानंद सरस्वती मार्गावरील रोड क्रमांक ११ वरील हेरिटेज प्राईड इमारतीजवळ मंगळवारी दुपारी सुमारे २.५८ वाजता रस्त्यालगत उभे असलेले एक मोठे पिंपळाचे झाड उन्मळून युनिव्हर्सल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मेक फोर्स कंपनीच्या स्कूल बसवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बसमधील १२ विद्यार्थ्यांना बसच्या कंडक्टरने तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाने बचावकार्य पूर्ण करून परिसर सुरक्षित केला. या दुर्घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली, तर एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होती.

Tree Collapse School Van Chembur
Mumbai Rain News : पहिल्‍याच पावसाने मालाड, कांदिवलीत पाणीच पाणी

सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने झेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. झेन रुग्णालयातील कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या विहान श्रीवास्तव (वय ११) याला सायंकाळी ४.२३ वाजता मृत घोषित करण्यात आले.

उर्वरित चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, झाड उन्मळून पडण्यामागील कारणांचा शोध संबंधित यंत्रणांकडून घेतला जात असून, या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news