Marathi Language Rule: मराठी भाषेच्या सक्तीविरोधात कॅबचालकांची हायकोर्टात धाव; अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी

सरकारच्या या निर्णयामुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असून या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
Bombay High Court
Bombay High CourtPudhari
Published on
Updated on

मुंबई: ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित कॅबचालकांना मराठी व्यवहारात्मक ज्ञान असणे अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कॅबचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असून या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने २० ऑगस्टपासून अमराठी टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचालकांच्या मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानाची तपासणी करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. मात्र

Bombay High Court
OBC Caste Census: जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम पाहिजे; छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ओबीसींचा मोर्चा

सरकारचा हा निर्णय चालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असून मोटार वाहन कायद्याच्या विरोधात आहे, या कायद्यात वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी भाषेची कोणतीही अट नमूद केलेली नाही, असा दावा करत मोहम्मद अहमद, मोहम्मद शेख, सियाद अहमद आणि सादिक खान या चौघांच्या वतीने ॲड. विवेक शुक्ला याचिका दाखल केली आहे.

Bombay High Court
Mumbai Mayor Ritu Tawde: वादग्रस्त कारकीर्द ठरू शकते महापौरांसाठी अल्पमुदतीची...; भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज, नव्या महापौरांचा शोध

या याचिकेवर लवकरच प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news