Mumbai Water Tanker App : टंचाईग्रस्‍त मुंबईसाठी आता महानगरपालिकेचे टँकर ॲप

घरबसल्‍या तातडीने नोंदणी शक्‍य
Mumbai Water Tanker App
Water Tanker pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राजेश सावंत

पाणीटंचाईच्या वेळी टँकरचे पाणी मागवायचे झाल्यास महापालिका अथवा खाजगी टँकरवाल्याला फोन लावावा लागतो. पण आता लवकरच महानगरपालिका नागरिकांसाठी टँकर ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. त्यामुळे घरबसल्या या ॲप्लिकेशनवरून तातडीने टँकर मागवणे शक्य होणार आहे.

मुंबई शहराला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असला तरी अनेक भागात आजही टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणी कपातीच्या काळात तर मोठ्या प्रमाणात टँकरची आवश्यकता भासते. अशावेळी नागरिकांना महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयासह खाजगी टँकरवाल्याकडे फोनद्वारे संपर्क साधावा लागतो. अनेकदा फोन लागत नसल्यामुळे संपर्क साधला जात नाही. परिणामी टँकरचे पाणीही वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने टँकर वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी टँकर ॲप्लिकेशन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ॲप्लिकेशनवर टँकरची नोंद केल्यानंतर घरापासून जवळ असलेल्या टँकर भरणा केंद्रातून टँकर उपलब्ध होणार आहे.

Mumbai Water Tanker App
Panvel Karjat Local Train : पनवेल-कर्जत दरम्यान ५० लोकल

मुंबई महानगरपालिकेचे ३१ टँकर भरणा केंद्र असून या केंद्राद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या टँकर भरणा केंद्रावर साधारणतः दहा मिनिटांमध्ये १० हजार लिटरचा एक टँकर भरला जातो. हा वेग वाढवण्यासाठी आता ८० मिमी व्यासाचा अल्ट्रासॉनिक जलमापक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या नव्या जलमापक यंत्रामुळे एका तासामध्ये ६३ ते ७८ हजार लिटर पाणी भरणा करणे शक्य होणार आहे. सध्या एका तासांमध्ये ४० ते ५० हजार लिटर पाणी भरणा केले जाते. पाणी भरण्याचा वेग वाढल्यामुळे नागरिकांना टँकरही तितक्याच जलद उपलब्ध होणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हा होणार फायदा

नागरिकांनी एप्लीकेशनवर टँकरची मागणी केल्यानंतर जीपीआरएस द्वारे टँकर जेथे मागणी करण्यात आली आहे तेथे पोहचणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपला पत्ता देण्याचीही गरज भासणार नाही. विशेष म्हणजे या एप्लीकेशनवर दिवसभरात होणाऱ्या पाणीपुरवठ्याची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्या टँकर भरणा केंद्रावरून किती पाण्याचा पुरवठा केला गेला याची माहितीही उपलब्ध होणार आहे.

Mumbai Water Tanker App
Bhiwandi traffic congestion : गोडाऊन आले; रस्ते मात्र ‘जैसे थे’!

ॲप्लिकेशनबद्दल अभ्यास

टँकर ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करून लवकरच अभ्यास करण्यात येणार आहे. या ॲप्लिकेशनवर कोण-कोणती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देता येईल, याचा आढावा घेण्यात येणार आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या मोबाईल वरूनच फोन न करता टँकर मागवणे शक्य होणार आहे.

दररोज २५० ते ३०० टँकरची मागणी

  • मुंबईत सध्या पाणी कपात सुरू असल्यामुळे दररोज महापालिकेच्या ३१ टँकर भरणा केंद्रातून सरासरी दररोज २५० ते ३०० टँकरची मागणी असते. त्याशिवाय खाजगी टँकरद्वारे शहरातील बांधकाम व अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येतो.

  • परंतु खाजगी टँकर पेक्षा महापालिका पूर्वत असलेले पाणी अधिक शुद्ध असल्यामुळे या पाण्याला अधिक मागणी असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news