BMC Diwali Bonus: पालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार बोनस? लवकरच वाटाघाटी करून निर्णय घेणार

गेल्या वर्षी ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान; यंदा वाढीव बोनससाठी प्रशासन कामगार संघटनांशी चर्चा करणार
BMC Engineers Transfer
BMC Engineers Transferpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त ३३ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) देण्याची तयारी महापालिका प्रशासनाची असल्याचे समजते. याबाबत कामगार संघटनांशी चर्चा करून, दसऱ्यानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त यंदा २० टक्के म्हणजेच सरासरी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली होती.

BMC Engineers Transfer
Kandivali railway station incident: कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ; महिला टीसी आणि प्रवाशामध्ये झटापट

परंतु मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा दीड ते दोन हजार रुपये वाढीव सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रशासन अनुकूल असल्याचे समजते. गेल्या वर्षी ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता.

यावेळी हा बोनस ३३ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. बोनसबाबत कामगार संघटनांशी वाटाघाटी करून, अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

BMC Engineers Transfer
Ambivli Shahad bridge: ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा होणार? आंबिवली-शहाडदरम्यान सहापदरी पुलाची तयारी

दरम्यान दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी वाढती महागाई लक्षात घेता किमान ५० हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. कामगार संघटना व प्रशासनामधील तिढा न सुटल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हा तिढा सोडवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना जेवढा बोनस मिळणार आहे तेवढाच बोनस महापालिका खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांची दिवाळीही आनंदात जाणार आहे.

आरोग्य सेविकांच्या भाऊबीज भेटीमध्येही वाढ होणार

महापालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त बोनस मिळाल्यास मुंबई शहर व उपनगरांत विविध ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना देण्यात येणाऱ्या भाऊबीज भेटीमध्येही ५०० रुपये वाढवण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी त्यांना १४ हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात आली होती. बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना ५ हजार भाऊबीज भेट मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news