BMC Education Budget | मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा ४,२८२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Mumbai municipal corporation
मुंबई महानगरपालिका(Pudhari Photo)
Published on
Updated on

मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल ४ हजार २८२.०८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्याकडे सादर केला. गतवर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात २९३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रासाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४ हजार २४८.०८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यात महसुली तरतूद ३,७५८.०८ कोटी तर भांडवली तरतूद ४९० कोटी रुपयांची आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, विद्यार्थी कल्याण आणि गुणवत्ता वृद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे. मुबई शहरातील ९३१ प्राथमिक शाळांमध्ये २ लाख ७६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ७ हजार ४५३ शिक्षक सेवा देत आहेत. याशिवाय १८७ माध्यमिक शाळा, विशेष शाळा आणि विविध शिक्षण मंडळांशी संलग्न २१ शाळा कार्यरत आहेत

नव्या उपक्रमांत ‘मिशन सुफळ’ अंतर्गत एनसीसी, स्काऊट-गाईड, संगीत व कला केंद्रे, तसेच कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. ५५ शाळांमध्ये उभारलेली खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणखी ४० शाळांत सुरू होणार असून, १७५ शाळांमध्ये स्टेम रोबोटिक्स लॅब कार्यरत आहेत.डिजिटल वर्गखोल्या, टॅब वाटप, सायबर साक्षरता प्रशिक्षण आणि इंग्रजी लॅब यासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांसाठी ३४० कोटी रुपयांची तरतूद असून, ५७ दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, मुलींसाठी उपस्थिती भत्ता, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच बेस्ट बसने मोफत प्रवास यांसारख्या योजना सुरूच राहणार आहेत. एकूणच, शिक्षणाचा दर्जा उंचावून प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news