

Mumbai Birth Rate Decline
मुंबई : मुंबईत जन्मसंख्या दर ३.८० टक्केने घटला आहे. २०१४ या वर्षात जन्मदर १३.८३ इतका होता. २०२३ या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला असता हा दर १०.०३ टक्के इतका होता. त्यामुळे मुंबईत वार्षिक जन्मसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचे स्पष्ट होते.
मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सर्वेनुसार मुंबई शहरात जन्मदर कमी होताना दिसून येत आहे. मुंबई शहर व उपनगरात दर दोन वर्षांनी जन्माला येणाऱ्या बालकांची नोंद करण्यात येते. व या संख्येनुसार जन्मदर काढण्यात येतो. मुंबई शहर व उपनगरात २०१४ मध्ये १ लाख ७४ हजार ९०२ बालकांचा जन्म झाला. यात सर्वाधिक सुमारे ७३ हजार ३१६ बालके पश्चिम उपनगरात जन्माला आली. हा दर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १३.०५ टक्के इतका होता. शहर व पूर्व उपनगरात २०१४ मध्ये पश्चिम उपनगराच्या तुलनेत कमी बालकांचा जन्म झाला असला तरी येथील लोकसंख्येच्या तुलनेत जन्मदर सरासरी १४ टक्केपेक्षा जास्त होता. यावर्षी पूर्व उपनगरात ५६ हजार ३१६ तर शहरात ४५ हजार २७० बालकांचा जन्म झाला.
२०२३ मध्ये आलेल्या अहवालानुसार वर्षभरात १ लाख ३० हजार ५६२ बालकांनी जन्म घेतला. म्हणजेच जन्मसंख्या सुमारे ४४ हजाराने घटली. २०२३ मध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक ५२ हजार ५३६ बालकांनी जन्म घेतला तरी लोकसंख्येच्या तुलनेत जन्मदर ९.०९ टक्के इतका होता. तर शहरांमध्ये ४० हजार ९९६ बालकांनी म्हणजेच पश्चिम उपनगराच्या तुलनेत १२ हजार बालके कमी असूनही जन्मदर १२.०७ टक्के इतका होता. पूर्वोपनगरात 37 हजार सत्तावीस बालकांचा जन्म झाला येथील जन्मसंख्या दर ९.२४ टक्के इतका होता.
* शिक्षण व आरोग्य सेवांमधील प्रगती
* कुटुंब नियोजन व गर्भनिरोधकांचा वापर
* वाढता शैक्षणिक खर्च, अन्य संगोपनाचा खर्च
* धावपळीच्या जीवनात मुलांच्या संगोपनाचा प्रश्न
* नवरा बायको दोन्हीही नोकरीला
* विवाह उशिरा करण्याची किंवा अविवाहित राहण्याची प्रवृत्ती
* पालकत्वापेक्षा आपल्या करिअरला अधिक महत्त्व
* शहरीकरणामुळे जीवनशैलीत बदल होतोय
* महापालिकेकडून होणारे प्रबोधन
* एकल कुटुंब पद्धत
२०२३ शहर पश्चिम उपनगर पूर्व उपनगर
जन्मसंख्या ४०.९९६ ५२,५३९ ३७,०२७
जन्मदर(दर हजारी) १२.०७% १२.०७% १२.०७%
२०१४ शहर पश्चिम उपनगर पूर्व उपनगर
जन्मसंख्या ४५,२७० ७३,३१६ ५६,३१६
जन्मदर(दर हजारी) १४.४४% १३.०५% १४.४७%