Mumbai Accident: टॅक्सीतून उतरताना महिलेला बेस्ट बसने चिरडले; वरळीतील घटना

वरळी एसटी कार्यालयासमोरील सिग्नलवर टॅक्सीतून उतरताना ६० वर्षीय महिलेला बेस्ट बसने धडक दिली. बसच्या मागील चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू झाला.
Mumbai Accident
Mumbai AccidentPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसचे अपघाताचे सत्र अजूनही काही थांबलेले नाही. वरळी येथील एसटी कार्यालयासमोर वाहतूक सिग्नलवर टॅक्सीतून उतरताना एका महिलेला बेस्ट बसने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली.

या अपघातात ६० वर्षीय महिलेचा बस खाली चिरडून मृत्यू झाला आहे. वनमाला साबळे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या अपघातातील बेस्ट चालक आणि बस दोन्हीही कंत्राटी आहेत.

बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल आगारातील कंत्राटदाराची ए-१५४ या मार्गावरील बस क्रमांक ७१६१ भायखळा स्थानक येथून नेहरू तारांगणकडे जात होती. सकाळी सुमारे ११.२५ वाजता ही बस वरळी एसटी कार्यालयासमोरील वाहतूक सिग्नलवर थांबली होती.

त्याचवेळी बसच्या बाजूला एक टॅक्सी उभी होती. सिग्नल लागला असल्याने या टॅक्सीमधून एक महिला खाली उतरली. मात्र त्याचवेळी, सिग्नल सुरू झाल्याने बस चालकाने जोराने बस पुढे नेली आणि टॅक्सीमधून उतरत असलेल्या महिलेला बसची जोराची धडक बसली. या अपघातात बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाच्या खाली ही महिला चिरडली गेली.

Mumbai Accident
Mithai Price Hike: सण-उत्सवांच्या काळात मिठाईचा गोडवा झाला कडू; महागाईमुळे दरात वाढ

या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. महिलेच्या डोक्यातून तसेच कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. बसमधील प्रवाशांच्या मदतीने वाहकाने तातडीने जखमी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच दुपारी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, या अपघातानंतर वरळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. दादर टिळक पुलाजवळ बेस्ट बसचालकाला मारहाण बेस्ट बस चालकाने रस्ता न दिल्यामुळे मागून येणाऱ्या एका संतप्त कार चालकाने भर रस्त्यात बेस्ट बस चालकाला मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री दादर परिसरात घडली. नागरिकांनी मध्यस्थी करून चालकाची मारहाणीतून सुटका केली.

Mumbai Accident
Mumbai Police Crime Detection: मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी; ८५ टक्के गुन्हे उघडकीस, ५५९ फरार आरोपींना अटक

त्यानंतर बेस्ट बस चालकाने पोलीस ठाण्यात जाऊन कार चालकाची तक्रार केली.वडाळा डेपोची बस क्रमांक ४० रविवारी रात्री शिवडी बस स्थानकावरून दिंडोशीकडे जात होती. ही बस दादर टिळक पुलाजवळ येताच बस चालकाने रस्ता न दिल्यामुळे मागून येणाऱ्या एका संतप्त कार चालकाने बसला ओव्हरटेक करून आपली कार भर रस्त्यात बेस्ट बससमोर थांबवली आणि बस चालकाला शिव्या देत मारहाण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news