Mumbai clean beaches : मुंबईचे समुद्रकिनारे झाले स्वच्छ आणि सुंदर

पावसात वाहून आलेल्या 952.5 मेट्रिक टन कचर्‍याची पालिकेकडून विल्हेवाट
Mumbai clean beaches
मुंबईचे समुद्रकिनारे झाले स्वच्छ आणि सुंदरpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध समुद्रकिनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनार्‍यांचा परिसर स्वच्छ केला आहे.

15 ते 23 ऑगस्ट दरम्यान ही स्वच्छता मोहीम राबवत 952.5 मेट्रिक टन कचरा संकलीत करून विल्हेवाट लावली. सुमारे 380 कर्मचार्‍यांनी सहा संयंत्रांच्या सहाय्याने दिवसरात्र काम करीत सहा समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ व सुंदर केले.

स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनार्‍यांच्या परिसरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

हे समुद्र किनारे स्वच्छ केले

स्वराज्यभूमी - 23 मेट्रिक टन

दादर-माहीम - 300 मेट्रिक टन

वेसाव - 200 मेट्रिक टन

जुहू - 375 मेट्रिक टन

मढ-मार्वे - 34.5 मेट्रिक टन

गोराई - 20 मेट्रिक टन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news