

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील बांद्रा पूर्व येथे ओएनजीसी कॉलनीत आज (दि. ४) दुपारी अडीच वाजता भीषण आग लागली. ज्ञानेश्वरीनगर मधील १० ते १५ झोपड्यांमध्ये अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.