mumbai airport terminal 1: मुंबई विमानतळ टर्मिनल 1 वर आग

mumbai airport terminal 1 fire update: शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
mumbai airport fire news
mumbai airport fire newsPudhari
Published on
Updated on

mumbai airport terminal 1 fire news bmc update

मुंबई : मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथे आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. विलेपार्ले परिसरातील या टर्मिनलवर सुमारे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे विमान वाहतुकीवर काही परिणाम झाला आहे का, या बद्दल रात्री साडे आठपर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती काय?

संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही लाग आलगी. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या तळमजल्यावर ही आग लागली. या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news