

मुंबई ः येथील एका 26 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला सात तास डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून तिच्याकडून 6.5 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर अभिनेत्रीने ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. आपण एका मोबाईल कंपनीचा अधिकारी बोलत आहोत, असा फोन संबंधित अभिनेत्रीला आला. त्याने सांगितले की, तिच्या सिमकार्डवरून बँक फसवणुकीचे व्यवहार करण्यात आले आहेत आणि हे प्रकरण गंभीर आहे.