

मुंबई : फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला असे सूर्य किरण श्री मुंबादेवीचा मुखस्पर्श दरवर्षी करत असतात. महत्वाचे म्हणजे साधारणपणे ब्रिटिश काळात या मंदिराची स्थापना झाली असली तरी आज एवढ्या वर्षांमध्ये मुंबई शहरात प्रचंड प्रमाणात नवीन नवीन बांधकामे होऊन देखील मुंबईच्या ग्रामदेवीचा असा सूर्यकिरणांचा होणारा अभिषेक अजूनही अविरत सुरू आहे.
आजपर्यंत ही सूर्यकिरणे कोणतेही बांधकाम किंवा टोलेजंग इमारती थांबवू शकलेले नाहीत हे आश्चर्य आहे. ही नेत्र सुखद पर्वणी पाहण्यासाठी यादरम्यान मुंबादेवी मंदिरात सकाळच्या सुमारास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.