

Mukesh Ambani supports PM Modi
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून सरकारला पाठिंबा मिळत असताना, रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले समर्थन दिले आहे. अंबानी म्हणाले, "या कठीण काळात तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. पाहलगाम घटनेनंतर तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी आलात, हा देशासाठी मोठा संदेश आहे. भारत आता दहशतवादाविरोधात एकजूट झाला आहे."
अंबानी यांनी स्पष्ट सांगितले की, "देशाच्या सुरक्षिततेच्या आणि शांततेच्या लढाईत तसेच उद्योग जगातही पंतप्रधानांसोबत उभा आहे."
ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांतता, न्याय आणि मानवतेसाठी लढत आहेत आणि त्यांना संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे."
या आधीही अनेक मोठ्या उद्योजकांनी पाहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. पण अंबानी यांचे वक्तव्य विशेष महत्त्वाचे मानले जात आहे कारण त्यांनी थेट पंतप्रधानांच्या कामगिरीचं समर्थन केलं आहे.