Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी पंचसूत्री आराखडा जाहीर

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती
MSRTC Panchsutri roadmap
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी पंचसूत्री आराखडा जाहीरpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‌‘पंचसूत्री आराखडा‌’ तयार केल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.

MSRTC Panchsutri roadmap
High Court warning to child | पालकांची गैरसोय झाल्यास कारवाई : हायकोर्टाची मुलास तंबी
  1. एसटीच्या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी 10 वाजता आगारात, 11 ला विभागात आणि 12 वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे.

  2. डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक असल्याने असल्याने किलोमीटर प्रति 10 लीटरनुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल.

  3. आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यात, असे निर्देश आहेत.

  4. आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान 80 टक्के पेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता, आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‌‘दत्तक‌’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे अशा अनेक सुधारणा होत आहे.

  5. स्वच्छ, टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती दिली जाईल.

MSRTC Panchsutri roadmap
BMC elections : शिंदे गटाची 50 टक्के जागांची मागणी मुंबईत भाजपला लहान भाऊ करणारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news