MSRTC land lease extension : एसटी महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा करार कालावधीत वाढ

साठ वर्षांऐवजी आता दोन टप्प्यांत 98 वर्षांचा करार
MSRTC land lease extension
एसटी महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा करार कालावधीत वाढpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( एसटी ) अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करण्याच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 ऐवजी 49 वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून 98 वर्षे करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 2001 मध्ये भाडेकराराचा कालावधी 30 वर्षे होता. त्यानुसार महामंडळाने 45 प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या धोरणानुसार राबविले. पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ पनवेल व छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पांना प्रतिसाद लाभला. त्यामुळे 2024 मध्ये नवे धोरण आखण्यात आले. या धोरणात भाडेपट्टा कराराचा कालावधी 30 वर्षांवरून 60 वर्षे करण्यात आला. हे धोरण तयार करतानाच विविध महामंडळ आणि प्राधिकरणांकडील भाडेपट्टा करारांचा कालावधी 99 वर्षे असल्याचे तज्ज्ञांच्या समितीने लक्षात आणून दिले होते.

हा कालावधी वाढविल्यास प्रकल्पांची व्यवहार्यता वाढते, तसेच महामंडळास अपेक्षित आगाऊ प्रिमीयम म्हणून दीड ते दोनपट अधिक मिळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यानुसार महामंडळाच्या संचालक मंडळाने आपल्याकडील विविध जागांवर सार्वजनिक-खासगी सहभागाअंतर्गत (पीपीपी) प्रकल्प राबविण्यासाठी भाडेकराराचा कालावधी 60 वर्षांऐवजी 99 वर्ष करण्यास मान्यता दिली.

त्यानुसार महामंडळाच्या जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर व्यवहार्य व्हावा यासाठी भाडेपट्टा कराराचा कालावधी 60 वर्षांऐवजी आता 49 वर्र्षे अधिक 49 वर्षे असे एकूण 98 वर्र्षे करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यात कराराचे नुतनीकरण हे प्रचलित धोरण, व नियमांनुसार करण्यात येणार आहे.

या कालावधी वाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभणार आहे. बसस्थानके, बस आगार, तसेच महानगरांसह, अन्य नागरी भागात प्रवाशांसह, विविध घटकांना चांगल्या सुविधा पुरविता येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news