ST bus ticket price: प्रवाशांना झटका! एसटीची १० टक्के भाडेवाढ आणखी महिनाभर कायम; कारण काय?

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ आणखी एका महिन्यासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ST bus MSRTC
ST bus MSRTC ST bus MSRTC
Published on
Updated on

ST bus ticket price

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ आणखी एका महिन्यासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना १५ जुलै पर्यंत वाढीव दरानेच प्रवास करावा लागणार आहे.

ST bus MSRTC
PMPML Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा पीएमपीला झटका; महिन्याला 5.40 लाखांचा वाढीव भार

उन्हाळी गर्दीच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटी महामंडळाने १५ एप्रिल २०२६ पासून १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. ही वाढ १५ जूनपर्यंत लागू होती; मात्र आता मुदतवाढ देण्यात आली आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ यामुळे महामंडळाच्या खर्चात वाढ झाली आहे. वाढलेला खर्च लक्षात घेऊन भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या आर्थिक स्थिती खराब आहे. एप्रिल २०२६ मध्ये एसटी महामंडळाला ७६ कोटी रुपयांचा तोटा झाला. प्रवाशांवर १० टक्के अतिरिक्त भाडेवाढीचा भार टाकूनही तोटा कायम आहे. मागील वर्षी (एप्रिल २०२५) कोणतीही हंगामी भाडेवाढ नसताना महामंडळाला १४ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

ST bus MSRTC
CNG Price Impact: सर्वसामान्यांचा खिशाला कात्री, सीएनजी दरवाढीमुळे कॅब ऑटो प्रवासही महागणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news