ITI Admission : आयटीआयसाठी 14 हजारांहून अधिक नोंदणी

1 लाख 57 हजार जागांसाठी प्रक्रिया; 1 जूनपासून पसंतीक्रम भरता येणार
ITI Admission
आयटीआयसाठी 14 हजारांहून अधिक नोंदणीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट 2026 सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 14 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 13 हजार 744 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 10 हजार 942 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. तर 1 हजार 37 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे.

राज्यातील 418 शासकीय आणि 586 खासगी अशा एकूण 1 हजार 4 आयटीआय संस्थांमध्ये यंदा 1 लाख 57 हजार 664 जागांवर प्रवेश होणार आहे. यासाठी गुरुवारपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर अर्ज भरता येत आहेत.

ITI Admission
ITI Admission: राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेला 21 मेपासून सुरूवात

दहावीच्या गुणपत्रिका वितरित झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संचालनालयाने दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कौशल्याधारित अभ्यासक्रमांना वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांचा कल यंदाही पारंपरिक आणि तांत्रिक ट्रेडकडे असल्याचे दिसून येत आहे. विभागनिहाय पाहता पुणे विभागात सर्वाधिक 31 हजार 528 जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल नाशिक विभागात 30 हजार 668 आणि नागपूर विभागात 29 हजार 176 जागा आहेत.

ITI Admission
IIT Bombay placements 2026: आयआयटी कॅम्पसमध्ये सरासरी वेतन 26.45 लाखांवर

जिल्हानिहाय पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 12 हजार 452 जागा उपलब्ध असून नागपूर जिल्ह्यात 10 हजार 96 आणि जळगाव जिल्ह्यात 10 हजार 436 जागा आहेत. प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये तर अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

टॉप ट्रेडमधील जागा

  • इलेक्ट्रिशियन : 25 हजार 140

  • फिटर : 23 हजार 420

  • वेल्डर : 17 हजार 340

  • कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट : 10 हजार 824

  • मेकॅनिक डिझेल : 8 हजार 64

  • वायरमन : 7 हजार 200

  • मेकॅनिक (मोटार वाहन) : 6 हजार 696

  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 4 हजार 632

  • ड्रेस मेकिंग : 4 हजार 480

  • टर्नर : 3 हजार 720

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news