Mulund News | मुलुंडमध्ये नाल्यात सापडलेल्या अज्ञात अंड्यांतून घोरपडीच्या 5 पिल्लांचा जन्म

Wildlife Mumbai | 114 दिवसांच्या कालावधीत कृत्रिम पद्धतीने अंडी उबवण्यात यश
Urban Wildlife Discovery
मुलुंड : नाल्यात सापडलेल्या अज्ञात अंड्यांतून जन्माला आलेली घोरपडीची 5 पिल्ले(Pudhari Photo)
Published on
Updated on

Urban Wildlife Discovery

मुलुंड : महापालिकेच्या कर्मचार्‍यांना साफसफाईदरम्यान मुलुंडमधील एका नाल्यात सापडलेल्या अज्ञात अंड्यांचा अखेर उलगडा झाला असून त्या अंड्यांतून घोरपडीची 5 पिल्ले जन्माला आली आहेत. जवळजवळ चार महिन्यांनी कृत्रिम इनक्यूबेटरने या 5 पिल्लांचा जन्म झाला.

26 जानेवारी रोजी महानगर पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना मुलुंड येथील नाल्याच्या साफसफाईदरम्यान काही अंडी सापडली. सदर अंडी कोणत्या प्रजातींची आहेत याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे, त्यांनी रेस्किंक असोसिएशन फॉर वाईल्डलाइफ वेल्फेअर या प्राण्यांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणार्‍या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला व त्यांना या अंड्यांची माहिती दिली. यानंतर या संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी तात्काळ वन अधिकार्‍यांशी संपर्क साधला. वन विभागाने ही अंडी कृत्रिमरित्या उबवण्याची जबाबदारी एका एनजीओवर सोपवली.

Urban Wildlife Discovery
Mumbai news | बंद कारमध्ये गुदमरून चिमुरड्याचा मृत्यू

सापडलेली दहा अंडी, माती आणि नारळाच्या सालाच्या पावडरच्या मिश्रणाने भरलेल्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्यात आली व त्यांची काळजी घेण्यात आली. या मोहिमेत सहभागी असलेले प्राणीशास्त्रज्ञ चिन्मय जोशी व त्यांच्या टीमने या अंड्यांची व्यवहार्यता तपासण्यासाठी, ‘कँडलिंग’ नावाची पद्धत वापरली. हे तपासण्यासाठी उच्च-तीव्रतेच्या प्रकाशमानतेचा टॉर्च वापरण्यात आला. जर अंडी सुपीक असतील तर ती चमकतात, असे जोशी यांनी सांगत या दहा अंड्यांपैकी फक्त पाचच अंडी सुपीक असल्याचे त्यांना आढळले.

Urban Wildlife Discovery
Mulund Accident : मुलंडमध्ये हिट अँड रन; एकाचा मृत्यू, एक गंभीर

त्यानंतर अचूक परिस्थिती व योग्य ते तापमान राखत अंडी एका कंटेनरमध्ये उबवण्यात ठेवण्यात आली. अहवालानुसार, 114 दिवसांनी अंडी बाहेर येईपर्यंत बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आली. 21 मे रोजी अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पाचही पिलांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले.

अंडी सापडली ती जागा बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील काठावर आहे. ही जागा अशा सरपटणार्‍या प्राण्यांसाठी योग्य वातावरण आहे. घोरपड, सहजतेने, अंडी अशा ठिकाणी सोडते जेथे तिला वाटते की, अंडी उबविण्यासाठी ही सर्वात अनुकूल जागा आहे, अशी माहिती प्राणीशास्त्रज्ञ चिन्मय जोशी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news