

Kurla Railway Station Mock Drill
कुर्ला: मुंबईच्या विविध भागात आज (दि.७) सुरक्षा यंत्रणांनी युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास काय करावे? यासाठी मॉकड्रिल घेतल्या. मुंबई मधून देशाच्या विविध भागात दररोज हजारो प्रवासी जिथून प्रवास करतात. त्या कुर्लाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आले. यात रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, मुंबई पोलीस, डॉग स्कॉड या यंत्रणांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये पोलिसांकडून प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. रेल्वे स्थानकावर असलेल्या सामानांची, तपासणी करून प्रवाशांचे ओळखपत्र तपासण्यात आले.
लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक बाहेरगावी जात असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांकडून मॉक ड्रिल करण्यात आली. या वेळी प्रवाश्यांना युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास रेल्वेत अथवा फलाटावर काय उपाय करावेत.? संशयास्पद व्यक्ती, वस्तू आढळ्यास पोलिसांशी संपर्क करावा, सुरक्षित ठिकाणी जावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.