Aaditya Thackeray : मनसे-ठाकरे सेनेतील संवादाचा सेतू कायम, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या या भेटीप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत पक्षातील इतर सदस्यही उपस्थित होते.
Aaditya Thackeray Amit Thackeray birthday
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थान गाठले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मनसे आणि ठाकरे गटातील संवाद सेतू कायम असल्याचे यानिमित्ताने समोर आले.

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या या भेटीप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत पक्षातील इतर सदस्यही उपस्थित होते. यावेळी दोन्ही युवा नेत्यांमध्ये काही काळ संवादही झाला. ठाकरे कुटुंबातील दोन्ही युवा नेत्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news