

Sandeep Deshpande on CM Fadnavis
मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. याला आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला होता. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल यांनी केला होता.
हिंदी सक्तीविरोधात प्रत्येक वेळी आम्हीच आंदोलने करायची काय? एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का? तुम्ही फक्त सत्ता उपभोगणार का?" असे सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्रयांना केले. काही शाळा जबरदस्ती हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना विनंती आदेश रद्द झाला आहे आता हे बंद करावे. अन्यथा मनसेला त्यांच्याविरोधात आंदोलन कराव लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तामिळनाडू सरकारने तृतीय भाषा म्हणून हिंदीला स्पष्ट नकार दिला; पण आमच्या मुख्यमंत्र्यांना त्याचे काहीच वाटत नाही का? प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन करण्याची वाट बघितली जाते. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून काही गोष्टी करायला हव्यात. मुख्यमंत्री यांनी तृतीय भाषा सक्तीचा आदेश रद्द केला. त्यानंतर स्टेट बोर्डच्या शाळा जबरदस्ती हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे बंद करावे. अन्यथा मनसेला त्यांच्याविरोधात आंदोलन कराव लागेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. आमच्या पक्षाची भूमिका कोणतीही समिती गठीत करा पण हिंदी सक्ती करून दिली जाणार नाही , असा इशाराही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
महाराष्ट्रमधला मराठी माणूस ज्या पद्धतीने एकत्र आलाय, त्यामुळे आधीच सरकार हादरलंय. त्यामुळे तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला. मराठी माणसाची एकजूट होतेय, याच्यामुळे राष्ट्रीय पक्ष भयभीत झाले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम वेळोवेळी दिसेल, असा आरोप करत भाजप नेते आशिष शेलारा यांची मेमरी लॉस जास्त आहे. त्यांनी आमचा आधीचा मेळावा पाहिला तर त्यांनी अशी हिंमत बोलण्याची केली नसती, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.