

MNS Kannada Rakshana Vedike Alliance: हिंदी भाषा आक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कन्नड रक्षक वेदिके या दोन आक्रमक संघटना एकत्र येणार आहेत. मराठी भाषा, अस्मिता आणि महाराष्ट्र धर्मासाठी लढणारी मनसे आणि कानडी भाषा, अस्मिता यासाठी कट्टर भूमिका मांडणारे कन्नड रक्षक वेदिकेने हिंदी भाषा आक्रमणाविरूद्ध एक रोड मॅप देखील ठरवला आहे.
मनसे आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कर्नाटकात झाली. या बैठकीला मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटनीस योगेश परूळेकर तसेच कन्नड रक्षक वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी.ए. नारायण गौडा यांच्या कर्नाटकात महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत १० कलमी कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून तो प्रसिद्ध करण्याचा दोन्ही संघटनांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांमध्ये भाषा, सांस्कृतिक अस्मिता आणि बदलती लोकसंख्या याबाबत निर्माण होत असलेल्या प्रश्नांबाबत या बैठकत चर्चा झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिल्लीत इंडियन लँग्वेजेस फोरमचे महाअधिवेशन होणार आहे.
१. ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ची स्थापना करण्याचा निर्णय.
२. भारतीय भाषांचे हक्क, अस्मिता आणि हितसंबंधांच्या संरक्षणासाठी १० कलमी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करून प्रसिद्ध करण्याचा निर्णय.
३. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिल्लीत ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’चे महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, पुद्दुचेरी, गोवा, पश्चिम बंगाल, पंजाब यांसह इतर राज्यांतील भाषिक प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
४. कर्नाटक आणि महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांच्या भाषा, संस्कृती, अस्मिता आणि हक्कांवरील हल्ल्यांविरोधात संयुक्त आंदोलन उभारण्याचा निर्णय.
५. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिल्लीत ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’चे भव्य अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय