MLA Kalidas Kolambkar entered the World Records Book of India
आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंदFile Photo

आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद

सर्वात जास्‍त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे 'पहिले आमदार'
Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या ९ निवडणुका सलग जिंकून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय महानगरातील ते सर्वात जास्त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे 'पहिले आमदार' ठरले आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर आणि संस्थेचे विशेष प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आमदार कोळंबकर यांचा पदक आणि गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news