Mithi River garbage issue : वाकोला, वांद्रेत मिठी तुंबणार

नदीपात्रात जलपर्णी, कचरा आणि राडारोडा तसाच पडून
Mithi River garbage issue
वाकोला, वांद्रेत मिठी तुंबणारpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : जलपर्णी, प्रवाहात अडकून पडलेला कचरा आणि लाकडी, प्लास्टिक भंगार साहित्यामुळे मिठी नदीचे विस्तीर्ण पात्र अनेक ठिकाणी तुडुंब भरले आहे. पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप येथील साफसफाई झालेली नाही. त्यामुळे उपनगरात वाकोला, कालिना आणि वांद्रे परिसरात मिठी नदी पावसाळ्यात तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांताक्रूझ वाकोला पूल येथे गुरुवारी महापौर रितू तावडे यांनी मिठी पात्राजवळ भेट दिली. तेव्हा ही मिठीचे पात्र कचऱ्याने तुडुंब भरलेले होते. याच वाकोला ब्रिजच्या दक्षिण बाजूच्या पात्रात नदीचे पाणीही दिसत नाही एवढा कचरा आणि गाळ आहे.

येथील इंडियन एअर फोर्स मेसच्या मागील भागात प्रचंड घाण आहे. हंस भुजा रोडवरील पुलाखाली रिक्षा पार्किंग आणि गॅरेज आहे. त्यातून रिक्षा टायर्स, प्लास्टिक आवरण पात्रात जमा झाली आहेत. पुढे स्मशानभूमी आणि कालिना विद्यापीठाच्या जागेतून जाणाऱ्या मिठी नदीच्या पात्राची साफसफाई झालेली नाही.

पावसाळा तोंडावर आला असून अदयाप येथे साफसफाई सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना 26 जुलै 2005 रोजी झालेल्या महापुराची आठवण येऊन धडकी भरत आहे. पात्राची साफसफाई रखडल्यास जवळील डवरी नगर, टीचर कॉलनी, सिद्धार्थ नगर, सरकारी वसाहतमी भारत नगर परिसरात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे.

डॉ. विवेकानंद जाजू, समाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news