

मुंबई : नात्याला काळीमा फासणारी आणखी एक घटना मुलुंड येथे समोर आली आहे. लैंगिक अत्याचारप्रकरणी बालगृहात असलेल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे वडील, दोन भाऊ आणि एका ओळखीच्या व्यक्तीकडूनही दीर्घकाळ लैंगिक शोषण झाले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 असे अकरा महिने हे अत्याचार सुरू होते.
याबाबत मुलुंड पोलिसांनी सोमवारी तिघा आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पिडीत मुलीने नोव्हेंबर 2024 मध्ये त्याच परिसरातील एका अल्पवयीन मुलासह इतर तीन व्यक्तींविरुद्ध लैंगिक अत्याचाराची एक तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. मुलगी बालसुधारगृहात होती.
बालसुधारगृहातील अधिक्षकांना या मुलीने आपले वडील, दोन भाऊ आणि एका ओळखीच्या व्यक्तीकडूनही दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचे सांगितले. त्यानंतर बाल कल्याण समितीने तिचा जबाब नोंदवत हे प्रकरण मुलुंड पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. जबाबाच्या आधारे, पोलिसांनी वडील, मोठा भाऊ आणि ओळखीच्या व्यक्तीला अटक केली.