

मुंबई ः एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आणण्याचा प्रयत्न मी करणार, असे वक्तव्य शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी केले होते. ते म्हणाले होते, प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही. आमच्या चुका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. तसे झाले तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही. शिरसाटांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. तथापि, शनिवारी शिरसाटांनी घूमजाव केले. ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला.
शिरसाट यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते योगेश कदम म्हणाले, शिवसेनेची भूमिका हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतात. संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीत महत्त्व नाही. शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिले.