MHADA Flat Prices Mumbai: शहरातील घराइतकेच उपनगरातील घर महाग; सर्वसामान्यांसाठी घर खरेदी आणखी कठीण

दादर आणि गोरेगावच्या घरांच्या किंमतीतील फरक किरकोळ
MHADA Mumbai
MHADA MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या किंमती दरवर्षी नवे विक्रम करत आहेत. यंदाच्या सोडतीत शहर आणि उपनगरांतील घरांच्या किंमतींतील तफावत फारच कमी असल्याचे दिसत आहे. दादर आणि गोरेगाव येथील घरांचे क्षेत्रफळ जवळपास सारखे असूनही किंमतींमध्ये केवळ 30 लाखांचा फरक आहे.

गोरेगावच्या पत्राचाळीतील 85 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. या घरांचे क्षेत्रफळ 55.93 चौरस मीटर असून किंमत 1 कोटी 36 हजार 471 रुपये आहे.

MHADA Mumbai
Central Railway night block: मुंबईकरांनो लक्ष द्या! आज, उद्या ‌‘मरे’वर रात्रकालीन ब्लॉक

दादर येथील लोकमान्य नगरमधील स्वगृह सोसायटीतील 3 घरांचे क्षेत्रफळ 55.23 चौरस मीटर असून त्यांची किंमत प्रत्येकी 1 कोटी 30 लाख 33 हजार 950 रुपये आहे. ही घरेही अल्प उत्पन्न गटाची आहेत. मात्र यामुळे शहर आणि उपनगरातील दरी कमी झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना शहराप्रमाणेच उपनगरात घर घेणेही कठीण झाले आहे.

गोरेगावच्या शास्त्रीनगर येथील 58.8 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 11 लाख 54 हजार 270 रुपये आहे. चेंबूरच्या सुभाषनगर येथील 53.62 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 12 लाख 46 हजार 178 आहे. वरळीच्या प्रेरणा सोसायटीतील अल्प उत्पन्न गटाच्या घरांची किंमत 2 कोटींहून अधिक आहे.

MHADA Mumbai
Sion Hospital Fire: सायन रुग्णालयाच्या ओपीडीत एसीचा स्फोट; आग भडकली, धुराचे लोट

ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील घरे म्हाडाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक महाग घरे आहेत. या इमारतीतील 8 कोटींचे एक घरे नुकतेच प्रथम प्राधान्य योजनेतून विकले गेले. मात्र इतर घरांच्या प्रश्न अजून सुटलेला नाही. या इमारतीतील दोन घरे उच्च उत्पन्न गटासाठी सोडतीत आहेत. त्यांची किंमत साडे सहा कोटींहून अधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news