MHADA Mumbai Lottery: म्हाडाच्या एका घरासाठी 29 अर्ज; स्पर्धा कमी

2024च्या सोडतीत हे प्रमाण एका घरामागे 55 अर्ज असे होते.
MHADA Mumbai Lottery
MHADA Mumbai LotteryPudhari
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या सोडतीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 2 हजार 640 घरांसाठी 75 हजार 366 अर्ज म्हणजेच एका घरामागे केवळ 29 अर्ज आले आहेत. 2024च्या सोडतीत हे प्रमाण एका घरामागे 55 अर्ज असे होते.

MHADA Mumbai Lottery
South Mumbai Water Pipeline Project: दक्षिण मुंबई पाणीटंचाईमुक्त होणार!

गुरुवारी अर्ज प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. मात्र अनामत रक्कम भरण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. शनिवारी म्हाडाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2 हजार 640 घरांसाठी 97 हजार 613 अर्ज आले होते. त्यापैकी 75 हजार 366 जणांनी अनामत रक्कम भरली आहे. केवळ अनामत रक्कम भरलेले अर्जच ग्राह्य धरले जाणार आहेत.

यापूर्वी 2024 साली म्हाडाने 2 हजार 30 घरांसाठी सोडत काढली होती. त्यावेळी 1 लाख 12 हजार अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे एका घरासाठी 55 जण स्पर्धेत होते. त्या तुलनेत यंदाच्या सोडतीतील स्पर्धा कमी झाली आहे. त्यामुळे अर्जदारांना घर लागण्याची शक्यता वाढली आहे.

MHADA Mumbai Lottery
Mumbai 1BHK Rent: मुंबईत ‌‘वन बीएचके‌’ घराची भाडीही अवाक्याबाहेर

सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 10 जूनला दुपारी 3 वाजता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 12 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाइन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 16 जूनला दुपारी 3 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news