Mumbai MHADA News | 8 हजार भाडेकरूंचे म्हाडा करणार पुनर्वसन

Kamathipura MHADA Tender | कामाठीपुरा समूह पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध, 4500 सदनिका होणार उपलब्ध
MHADA Rehabilitation Project
MHADA Tender(File Photo)
Published on
Updated on

MHADA Rehabilitation Project

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कामाठीपुरा क्षेत्राच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक 1 ते 15 या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाच्या 34 एकर जागेवर 943 उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे 6 हजार 625 निवासी व 1 हजार 376 अनिवासी असे एकूण 8 हजार 1 भाडेकरू वास्तव्यास असून 800 जमीन मालक आहेत.

MHADA Rehabilitation Project
MHADA | अत्यल्प उत्पन्न गटाला मिळणार २० लाखांत घर

या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ सुमारे 73,144.84 चौरस मीटर आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या 8 हजार भाडेकरूंना हक्काचे कायमस्वरूपी घर प्राप्त होणार आहे.

MHADA Rehabilitation Project
MHADA News : विरारच्या नाराज सोडत विजेत्यांना म्हाडाचा दिलासा

प्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून माहिमतुरा कन्सल्टन्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा आराखडा ‘कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प - अर्बन व्हिलेज’ या नावाने तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या व सुरक्षित सदनिका, नियोजनबद्ध पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वाणिज्यिक इमारत, मनोरंजनाचे मैदान यांसारख्या सुविधांचा देखील समावेश असणार आहे.

तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडास 44 हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार असल्याने मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडास मोठ्या प्रमाणात गृहासाठा निर्माण करता येईल. तसेच विकासकास 5 लाख 67 हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे 4 हजार 500 सदनिका उपलब्ध होणार आहेत.

जमीन मालकांना मोबदला

कामाठीपुरा क्षेत्रातील जमीन मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 50 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाकरता 500 चौरस फूट क्षेत्रफळाची 1 सदनिका, 51 चौरस मीटर ते 100 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाकरता 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या 2 सदनिका, 101 चौरस मीटर ते 150 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाकरता 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या 3 सदनिका, 151 चौरस मीटर ते 200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या 4 सदनिका, 200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक 50 चौरस मीटर भूखंड क्षेत्रफळाकरता 500 चौरस फूट क्षेत्रफळाची 1 अतिरिक्त सदनिका जमीन मालकांना दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news