Maharashtra Metro Project| मेट्रो प्रकल्पांना गती; तीन वर्षांत कामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

२०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करणार
Metro Project
Metro ProjectPudhari
Published on
Updated on

मुंबई: मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबई महानगरासह पुणे, नागपूर अशा शहरी भागांमध्ये मेट्रोच्या माध्यमातून नागरी विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Metro Project
SET Exam Paper Leak: सेट परीक्षा होती आरोपींचे पुढचे टार्गेट! टीईटी पेपरफुटी रॅकेटचा धक्कादायक खुलासा

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे. सध्या राज्यात १७४ किलोमीटर मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून २९१ कि.मी. मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय १३० कि.मी. मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत असून ८७.१५ कि.मी. मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Metro Project
Pavitra Portal Teacher Recruitment: पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती रखडली; राज्यातील लाखो उमेदवार संतप्त

एकूण ६८३ कि.मी. लांबीचे मेट्रो मार्ग

मुंबई महानगर प्रदेशात एकूण ४२८.८९ किमी, पुणे महानगर प्रदेशात १६९.४५ कि.मी. आणि नागपूर महानगर प्रदेशात ८५.२० किमी मेट्रो नेटवर्क विकसित होत असून राज्यातील एकूण प्रस्तावित व कार्यान्वित मेट्रो जाळ्याची लांबी ६८३.५३ किमी इतकी आहे.

या मेट्रो कामांचे वर्षनिहाय नियोजन करण्यात आले आहे. चालू वर्षात ८७ किमीच्या मेट्रो मार्गासह ५६ स्थानकांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तर, २०२९-३० मध्ये एकूण ३०२ किमी मार्गिकांसह १६१ स्थानकांच्या उभारणीचे उद्दिष्ट आहे.

भविष्यातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्प

मुंबई मेट्रो-११ (अणिक डेपो–वडाळा–गेटवे ऑफ इंडिया) - १७.५१ किमी

हडपसर–लोणी काळभोर व हडपसर–सासवड रोड - १६.६८ किमी

नवी मुंबई मेट्रो-१ए व २ (बेलापूर–सागर संगम व पेंधर - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) - १७.०९ किमी

कान्हान नदी–कान्हान सिटी (नागपूर फेज-२ विस्तार) - १.४५ किमी

मुंबई मेट्रो-८ (सीएसएमआयए–एनएमआयए) - ३४.९० किमी

मुंबई मेट्रो-१० (गायमुख–छत्रपती शिवाजी महाराज चौक) - ९.२० किमी चा मार्ग

मुंबई मेट्रो-१३ (शिवाजी चौक–वसई-विरार) - २५.०३ किमी

मुंबई मेट्रो-१२ए (मानपाडा–कल्याण–खुटारी–तळोजा) - १८.४० किमी

मुंबई मेट्रो- ३ विस्तार (कफ परेड–नवी नगर) - १.४० किमी

मुंबई मेट्रो-१४ (कांजूर–बदलापूर) – ४५.१५ किमी

पुणे मेट्रो फेज-३ (निगडी–वाकड–नाशिक फाटा–चाकण) – ४२ किमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news