मुंबईकरांना रविवारची सुट्टी घरीच घालवावी लागणार; मेन, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai Mega Block | परेवर आज, तर हार्बरवर उद्या १० तासांचा ब्लॉक
Megablock on Main Line and Harbor Line
मेन, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक Local File Photo
Published on
Updated on

मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार, २९ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Central Railway mega block) घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना रविवारची सुट्टी घरीच घालवावी लागणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर आज (शनिवारी) १० तासांचा मेगाब्लॉक, तर रविवारी रात्री हार्बर मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान, काही लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक (Central Railway mega block) घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. परिणामी, लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत कुर्ला ते वाशी दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी नेरुळ स्थानकावरुन प्रवास करु शकतात.

रविवारी रात्री हार्बरवर १० तासांचा पॉवर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील सहाव्या रेल्वे मार्गाच्या नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी रविवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.३० ते सोमवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपर्यंत दहा तासांचा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. रविवारी रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगावकरिता शेवटची लोकल चालविण्यात येणार आहे. ब्लॉक संपल्यानंतर सोमवारी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव लोकल सुटणार आहे. तर गोरेगाव स्थानकातून अप मार्गावर सीएसएमटीकडे जाण्यासाठी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी लोकल चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news