

मुंबई : विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी (दि.२२) मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण मेन मार्गासह सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्ग, व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mumbai railway mega block) घेण्यात येणार आहे. या काळात हार्बर मार्गावरील लोकल सेवा १०.१८ ते ३.४५ बंद ठेवण्यात येणार असून प्रवाशांना ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी व सेमी फास्ट सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी व सेमी जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकावर थांबतील आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
डाऊन धीम्या लाइनवर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल. ही लोकल सीएसएमटी येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून दुपारी ३.०५ वाजता सुटेल.
अप धीम्या लाइनवर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण लोकल असेल ही लोकल सकाळी १०.२५ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल परळ लोकल असेल ही ठाणे येथून सायंकाळी ०४.१७ वाजता सुटेल.
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल- वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी. (Mumbai railway mega block)
गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि डाऊन फास्ट मार्गावर शनिवार व रविवारच्या मध्यरात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत, गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकामासाठी कांदिवली येथे १० तासांचा मोठा ब्लॉक (Mumbai railway mega block) घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत या गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत. अंधेरी ते विरारपर्यंत ४.३० नंतर सर्व डाऊन जलद गाड्या ब्लॉक कालावधी पूर्ण होईपर्यंत डाऊन धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल व एक्स्प्रेस गाड्या १० ते २० मिनिट विलंबाने धावतील.