Maharashtra NEET Counselling 2025
मुंबई : वैद्यकीय समुपदेशन समितीचे (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याच्या दुसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडूनही वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 20 सप्टेंबरपासून दुसर्या फेरीला सुरुवात होणार आहे. यातील अंतिम निवड यादीची घोषणा 24 सप्टेंबर रोजी होईल.
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसर्या फेरीला विलंब झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पहिली फेरी विलंबाने सुरू केल्यानंतर दुसरी फेरी लांबणीवर टाकण्यात येत होती.
दुसर्या फेरीचे प्रवेश वेळापत्रक
दुसर्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील : 19 सप्टेंबर
पसंतीक्रम भरण्याचा कालावधी : 20 ते 22 सप्टेंबर
निवड यादीची घोषणा : 24 सप्टेंबर
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश : 25 ते 29 सप्टेंबर