एका महिन्यात एमबीबीएसची पदवी; १६ लाखांच्या मोबदल्यात प्रमाणपत्र

file photo
file photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी डेस्क : नीटवरून देशभरातील परीक्षार्थीमध्ये गोंधळ उडाला असतानाच गुजरातच्या मेहसाना येथील एका होमिओपॅथी डॉक्टरला १६.३२ लाख रुपयांच्या मोबदल्यात उत्तर प्रदेशच्या एका विद्यापीठाने एमबीबीएसची पदवी तीही केवळ एका महिन्यात बहाल केल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे.

या होमिओपॅथी डॉक्टरने कोणत्याही वर्गात हजेरी लावली नव्हती किंवा त्याची परीक्षाही घेण्यात आलेली नव्हती. ही पदवी बनावट असल्याचे या डॉक्टरच्या लक्षात आल्यानंतर त्याने २०१९ मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे जवळपास ५ वर्षांनंतर या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला.

जुलै २०१८ मध्ये सुरेश पटेल (४१) या होमिओपॅथी डॉक्टरला इंटरनेटच्या माध्यमातून औषध शास्त्रातील उच्च शिक्षणाविषयी सर्किंग करत असताना ऑल इंडिया अल्टरनेटिव्ह कौन्सिल फोरमविषयी माहिती मिळाली. या फोरमच्या माध्यमातून एमबीबीएसची पदवी देण्यात येते असे त्यांना कळले. या डॉक्टरने डॉ. प्रेमकुमार राजपूत याच्याशी संपर्क साधला असता बारावीच्या गुणांवर एमबीबीएसची पदवी मिळू शकते असे सांगण्यात आले. सुरुवातीला सुरेश पटेल यांना शौकत खान, डॉ. आनंदकुमार आणि अरुणकुमार हे तिघे तुम्हाला पदवी पूर्ण करण्यासाठी मदत करतील, असे आश्वासन राजपूत याने दिल्याचे पटेल म्हणाले.

संशय आला. पण राजपूत याने ही पदवी पूर्णतः कायदेशीर असून, ५ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर परीक्षा घेऊन पदवी दिली जाईल असे पटेल यांना सांगितले. त्यानंतर पटेल यांनी ५० हजार रुपये भरले, त्यांना झासीच्या बुंदेलखंड विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे पत्र आले. या दरम्यान राजपूत याच्याशी किमान २५ वेळा फोनवरून बोलणे झाल्याचे पटेल यांनी सांगितले. तसेच डॉ. शौकत खान, डॉ. आनंदकुमार आणि अरुणकुमार हे तिघे तुम्हाला पदवी पूर्ण करण्यासाठी मदत करतील, असे आश्वासन राजपूत याने दिल्याचे पटेल म्हणाले.

१० जुलै २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान आपण १६ लाख ३२ हजार रुपये फीच्या स्वरुपात भरले. त्यानंतर माझे वर्ग सुरू होण्याची मी वाट पाहिली. पण वर्ग काही सुरु झाले नाहीत. मार्च २०१९ मध्ये कुरिअरच्या माध्यमातून मला एमबीबीएसची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र आणि माझ्या नावचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. या सर्व कागदपत्रांवर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा स्टॅम्प होता असे पटेल यांनी सांगितले. पटेल यांनी यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. नंतर हे प्रकरण अहमदाबाद गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले.

  • कोणतीही परीक्षा न घेता उत्तर प्रदेशच्या विद्यापीठाची करामत
  • २०१९ मध्ये पोलिसांत तक्रार; गुन्हा मात्र ५ वर्षांनी दाखल
  • २०१९ मध्ये मेहसाना पोलिसांच्या पथकासोबत सुरेश पटेल दिल्लीला गेले. डॉ. आनंदकुमार यांच्या पत्त्यावर जाऊन या पथकाने शोध घेतला, मात्र ते तेथे कुणीही राहत नसल्याचे आढळले. पुढे या पथकाने दिल्लीतील एका खासगी बँकेच्या शाखेला भेट दिली. तेथे या पथकाला सुरेश पटेल यांच्याप्रमाणेच अनेकजण फसले गेल्याचे आढळले. मात्र त्यानंतर तपास थंड बस्त्यात गेला. दरम्यानच्या काळात पटेल यांनी आणखी पुरावे गोळा करून डिसेंबर २०२३ मध्ये मेहसाना पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news