

Sushma Andhare on Mathadi Inspector exam result : कामगार आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक ११ जून फॉर्म भरले गेले. २९ आणि ३० जुलै परीक्षा झाली, ५९ जागांसाठी परीक्षा झाली. या परीक्षेत दोन कायद्यांवर २४ प्रश्न विचारले गेले. या परीक्षेतील अभ्यासक्रमाबाबत आक्षेप आहे. तसेच नागपूरच्या एकाच केंद्रावरून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवरच संशय येत आहे. याचे उत्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. तसेच माथाडी निरीक्षक पदाची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, कामगार आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक परीक्षेचा निकाल एका वेगळ्याच वेबसाईटवरून जाहीर करण्यात आला. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. निधी चांदोरकर कोण आहेत? याची चौकशी व्हावी, यांनी निकाल का जाहीर केला, असा सवाल करत या परीक्षेत घोळ आहे असा आमचा आरोप आहे, तो सरकारने तपासावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची उत्तरे द्यावीत. यामध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
देशभरात सध्या पेपरफुटीचे वातावरण सुरू आहे. नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणी केंद्रात शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तेव्हा असे वाटले की, सरकार चुकांची पुनरावृत्ती टाळेल पण तसे झाले नाही. पुण्यात १२ दिवस एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. गुणरत्न सदावर्ते आणि विक्रम पाचपुते सरकारचेच काम करतात, असा आरोपही त्यांनी केला.
कामगार आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या भरतीमध्ये नागपूरच्या एकाच केंद्रावरून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. स्पर्धा परीक्षेचे सर्वात मोठे केंद्र पुणे आहे. मात्र सर्वाधिक माथाडी निरीक्षक पदासाठी सगळ्यात जास्त उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तुमसर, भंडारा, गोंदिया या भागातील विद्यार्थ्यांचे आहे. नागपूर विभागातील २८ तर पुण्यातील १५ विद्यार्थी टॉपर आहेत. या परीक्षेचा निकाल ६ ऑक्टोबरला निकाल टीसीएसवरून झाला नाही, एका खाजगी व्यक्तीच्या साईटवरून झाला आहे. निधी चांदोरकर कोण आहेत, त्यांनी हा निकाल प्रकाशित का केला? हा टेक्निकल पार्ट आहे. संगणकामध्ये गैरप्रकार झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करत आता गोडीत सांगते, नाही तर आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बाकी काही मुद्द्यांवर नाही पण सदावर्ते यांच्या या मुद्द्यावर मी सहमत आहे. त्यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले होते. सदावर्ते यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की, या केसमध्ये काही मदत लागत असेल तर त्यांना मी मदत करायला तयार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.