

मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील वजीरा नाका येथील एका निवासी इमारतीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरूद्ध गुजराती वाद समोर आला आहे. सोसायटी पदाधिकार्यांच्या मिटिंगमध्ये रहिवासी नंदकिशोर दत्तात्रय राऊत (वय 71) यांच्यावर 5 ते 6 जणांच्या गुजराती जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी आरोपी राकेश मुकुंदराय शहा, सुनिल मुकुंदराय शहा, अंकित हेमंत शेठ, किरीट चंद्रकांत ध्रुव आणि प्रतिक प्रकाश मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला मात्र कहोणालाही अटक झाली नाही. येथील सनराईज व्ह्यु सी.एच.एस. इमारतीमध्ये 13 एप्रिल 2025 ही घटना घडली होती. मात्र 3 मे रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली आहे.
सोसायटीची बैठक सुरु असताना अचानक राकेश शहा पाठीमागून आले व त्यांनी राऊत यांच्या पाठीत बुक्कीने मारहाण केली. त्यांच्यावर खुर्ची उचलून मारत तू सोसायटीमध्ये कसा राहतो, अशी धमकीही दिली आहे. जखमी राऊत यांना कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर ते एमएचबी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र त्यांची तक्रार घेण्यास टाळाटळ केली. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण सोसायटी सेलचे पदाधिकारी हेमंत खांडेकर यांची भेट घेतल्ीयानंतर गुन्हा दाखल झाला आहे.