पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी कलाक्षेत्राला धक्कातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परचुरे यांनी अनेक नाटके, चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. (Marathi Actor Atul Parchure Death)
अतुल यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.