राज्य सरकारकडून मराठा तरूणांना मोठा दिलासा, ३०० कोटींचा निधी वर्ग

Annasaheb Patil Mahamandal news: अर्थसंकल्पात सन 2025-26 आर्थिक वर्षाकरिताअण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ७५० कोटी रुपयांची तरतूद
Annasaheb Patil Mahamandal news
Annasaheb Patil Mahamandal newsPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मराठा तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी मदत करण्याच्या उद्देशाने मंजूर करण्यात आला आहे.

Attachment
PDF
202507151506040216
Preview
Annasaheb Patil Mahamandal news
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्ज मर्यादा वाढविली; …’इतके’ कर्ज मिळणार

यंदाच्या अर्थसंकल्पात सन 2025-26 आर्थिक वर्षाकरिता मराठा तरुणांसाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातील ३०० कोटींचा निधी थेट महामंडळाच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याने, फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Annasaheb Patil Mahamandal news
‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील’ साठी भरीव निधी

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच त्यांच्या उद्योजकतेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काय आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

सरकार मार्फत आपल्या राज्यात जे नवीन युवक युवती स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा नवीन व्यवसायिक उद्योजकांना मदत करण्याच्या हेतूने बिनव्याजी कर्जाची ही योजना चालू करण्यात आली आहे. राज्यातील युवकांना व्यवसायामध्ये भरारी घेता यावी उद्योग क्षेत्रात राज्य पुढे जावे यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील नवीन उद्योजकांना एकदम सोप्या पद्धतीने व त्वरित कर्ज मंजूर करून कर्जावरील व्याज परतावा दिला जातो. सदर कर्ज मंजूर करण्यासाठी महामंडळ मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news