

Manoj Jarange Patil :
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुद उपोषणाचा आज (दि. १) चौथा दिवस आहे. आज सकाळपासूनच मराठा आंदोलकांनी जाेरदार घाेषणबाजाी करत मंत्रालय परिसर दणाणून सोडला. आंदोलकांकडून मंत्रालयाबाहेर ( नाष्टा) केला. दरम्यान, मंत्रालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. येथे अतिरिक्त पोलिस मागविण्यात आले असून एमएसएफ MSF जवान सुद्धा मुंबई पोलिसांसोबत तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांनी आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची विनंती केली आहे. सामान्य मुंबईकरांनी तिकीट घराच्या बाजूने बाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. आज सकाळपासून सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण प्रश्नी आझम मैदानावर सुर असणार्या बेमुदत उपोषणाचा आजा चौथा दिवस आहे. त्यांच्यला वैद्यकीय तपासणीसाठी प्रशासनाकडून वैद्यकीय टीम पाठवण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मंत्रालय रस्तावरील बॅरिकेटिंगसमोर बसून चटणी भाकर खात आहेत.मराठा आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मदतीचा प्रचंड ओघ सुरु आहे. आंदोलकांची उपासमार होवू नये म्हणून शेतकरी बांधवांकडून नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरींसह शेंगदाणे चटणी व अन्य साहित्य पाठविण्यात आले आहे.
मंत्रालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. येथे अतिरिक्त पोलिस मागविण्यात आले असून एमएसएफ MSF जवान सुद्धा मुंबई पोलिसांसोबत तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांनी आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची विनंती केली आहे. सामान्य मुंबईकरांनी तिकीट घराच्या बाजूने बाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आज सकाळपासून सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सायन-पनवेल महामार्ग, वाशी टोल नाक्यासह मानखुर्दपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आज सोमवारी कार्यालयीन गर्दीही असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत.
मराठा आंदोलकांचे जथ्येच्या जथ्ये सीएसएमटीकडे लोकलने येत आहेत. त्यामुळे सीएसएमटीमध्ये अभूतपूर्व गर्दी होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक सुरु झाली. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. येथे जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कायदेशीर मुद्यांवर चर्चा हाेणार आहे.