

मुंबई : दोन समाजात शत्रुत्व वाढवणे व सार्वजनिक शांततेस बाधा आणणारी विधाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, मुंबई व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली.
हाके यांच्यावर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला. बीड जिल्ह्यातील श्रृंगारवाडी (ता. गेवराई) येथे ओबीसी महाएल्गार मेळाव्यावेळी लक्ष्मण हाके यांनी 13 सप्टेंबरला द्वेषपूर्ण व प्रक्षोभक भाषण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता आहे. ही शांतता रोखण्यासाठी हाकेवर कायदेशीर कारवाई करावी. याप्रश्नी डॉ. सुवर्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त तेजाळे यांची भेट घेतली.