

मुंबई : मुंबईत आलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांना अन्नपाणी आणि शौचालयाची सुविधा मिळू नये. ते आंदोलन सोडून निघून जावेत, अशी व्यवस्था सरकारने केल्याचा आरोप करून हे सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर वागत आहे. त्याऐवजी मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, असा संताप मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. विलंब लावला तर सरकारच्या अडचणी वाढतील. मुंबईत मराठा आंदोलकांचा ओघ वाढेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. शुक्रवारी ते आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलत होते.आणखी खूप लोक मुंबईत येणार आहेत.
लोकशाहीचा मार्ग सोडणार नाही, असे सांगत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा त्यांनी दिला. ते म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आले. मात्र, आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात आंदोलकांची मोठी गैरसोय झाल्याची तक्रार आंदोलक करत आहेत. आरक्षण मिळाले तर मराठे सरकारला कधीही विसरणार नाहीत. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील शौचालये बंद केले. परिसरातील चहाच्या टपर्या, खाण्यापिण्याची हॉटेल बंद केली आहेत. आंदोलकांना पाणीही मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे काही आंदोलक सीएसटी रेल्वे स्थानकात आसरा घेण्यासाठी गेले.
मुंबईत जर आमचे अन्नपाणी बंद करणार असाल तर तुमच्याही सभा महाराष्ट्रात कशा होतील, हे आम्ही पाहू. तुमच्या सभांना, रेस्ट हाऊसला जाणार्या पाईपलाईन बंद करू, असा इशारा त्यांनी दिला.