Maratha reservation : मराठा आंदोलकांचे अन्न, पाणी रोखले

सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर ः मनोज जरांगे- पाटील यांचा हल्लाबोल
Maratha reservation
मनोज जरांगे- पाटीलpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : आपल्या मागण्यासाठी मुंबईत आलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांना अन्न, पाणी आणि शौचालयाची व्यवस्था मिळू नये. ते आंदोलन सोडून निघून जावेत, अशी व्यवस्था सरकारने केली आहे. हे सरकार इंग्रजांच्यापेक्षाही क्रूर वागत आहे. सरकारने असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, असा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. मागण्या मान्य करण्यास विलंब लावला तर सरकारच्या अडचणी वाढतील. मुंबईत मराठा आंदोलकांचा ओघ वाढेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलत होते.

मंगळवार, बुधवारनंतर आणखी खूप लोक मुंबईत येणार आहेत. सरकारने न ऐकल्यास हे लोक येणार आहेत. तुम्ही आंदोलनाला एका-एका दिवसाची मुदतवाढ देऊन काहीही उपयोग नाही. तुम्ही आमच्या मागण्यांच्या अंमलबजावणीला वेळ लावला तर मराठे मुंबईकडे येतच रहातील. आरक्षणाला जसा-जसा विलंब लागले तसे-तसे लोक काम सोडून मुंबईकडे येणार आहेत, असे ते म्हणाले.

हा या आंदोलनाचा पहिला टप्पा देखील नाही. या आंदोलनाचे एकूण सात ते आठ टप्पे आहेत. आम्हाला माहिती होते की मुंबईत आम्हाला त्रास दिला जाणार आहे. म्हणूनच आम्ही सध्या फार कमी लोक मुंबईला आलो आहोत. आगामी दिवसांत आणखी लोक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार. तुम्हाला प्रत्येक कोपर्‍यात मराठे दिसतील. आम्ही आरक्षण घेणारच आहोत. आम्ही लोकशाहीचा मार्ग सोडणार नाही, असे सांगत अधिक तीव्र करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

पुढे बोलताना, तुम्ही मला तुरुंगात टाका. मी तुरुंगातही उपोषण करणार आहे. मला गोळ्या घातल्या तरी मी त्या झेलणार आहे. मी सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला. त्यामुळे जरांगे पाटील आणि सरकारमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आले. मात्र आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात आंदोलकांची मोठी गैरसोय झाल्याची तक्रार आंदोलक करत आहेत. अनेक शौचालये, हॉटेल्स बंद ठेवल्याची तक्रार केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, गोरगरीबांचे मन जिंकण्याची उत्तम संधी सरकारकडे आहे. मराठे सरकारला कधीही विसरणार नाहीत. आम्हाला आरक्षण मिळाले तर आम्ही सरकारचे आभार मानू. एक एक दिवस उपोषणाला मुदतवाढ देण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य कराव्यात.

पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील शौचालये बंद केले.परिसरातील चहाच्या टपर्‍या, खाण्यापिण्याची हॉटेल बंद केली आहेत. आंदोलकांना पाणीही मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे काही आंदोलक सीएसटी रेल्वे स्थानकात आसरा घेण्यासाठी गेले. हे पहाता सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार झाले, मराठा मुले ही माज नाही वेदना घेऊन आली आहेत. ती सरकारने समजून घ्यावी, अशा भाषेत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

मुंबईत जर आम्हाला अन्नपाणी बंद करणार असाल तर तुमच्याही सभा महाराष्ट्रात कशा होतील, हे आम्ही पाहू. तुमच्या सभांना, रेस्ट हाऊसला जाणार्‍या पाईपलाईन बंद करू.

मनोज जरांगे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news