Mumbai slum demolition : 1400 झोपड्यांवर हातोडा

मानखुर्दमधील 22 एकर शासकीय जमीन मोकळी
Mumbai slum demolition
Mumbai slum demolitionpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महापालिकेने मानखुर्द येथे बुधवारी पोलीस बंदोबस्तात मोठी अतिक्रमण कारवाई केली. घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या बॉम्बे सोप फॅक्टरीच्या (डब्बा कंपनी) शासकीय जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्यांवर हातोडा मारत ही 22 एकर जमीन मोकळी करून दिली. महापालिकेच्या एम.पूर्व विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालयाने ही कारवाई केली.

Mumbai slum demolition
Encroachment demolition : पूर्णेत रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमणांवर बुलडोझर

येथील अतिक्रमण कारवाईबाबत जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-5) देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‌‘एम पूर्व‌’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली.

या कारवाईसाठी सुमारे 200 कामगारांसह 3 पोकलेन, 7 जेसीबी, 10 डंपर, 2 ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक 1/2 (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरीची (डब्बा कंपनी) ही 22 एकर जमीन आहे. गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती.

Mumbai slum demolition
Kalyan guracharan Land Encroachment: गुरचरण जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात अनोखे आंदोलन; म्हैस घेऊन केडीएमसी कार्यालयात धडक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news