Blood Bag : रक्त पिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस अन्‌ मलेरिया चाचणी बंधनकारक

राज्यातील रक्तपेढ्यांसाठी ‘एफडीए’कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
Blood Bag
रक्त पिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस अन्‌ मलेरिया चाचणी बंधनकारक
Published on
Updated on

मुंबई : रक्तसुरक्षा, गुणवत्ता, रुग्ण व रक्तदात्यांच्या हितसंरक्षणासाठी रक्तपेढीतील प्रत्येक रक्त पिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस आणि मलेरिया चाचणी बंधनकारक करण्याची आदेश राज्याच्या अन्न तथा औषध प्रशासन विभागाने (एफडीए) दिले आहेत. सोबतच यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा रक्तपेढ्यांकडे वळवला आहे. त्यांनी राज्यातील सर्व परवानाधारक रक्त केंद्रांना तत्काळ त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

एफडीएने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला व रक्ताची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह रक्त मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रक्तदान शिबिरासाठीही नियमावली

रक्तदान शिबिरांचे आयोजन करताना आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे, आपत्कालीन सुविधा, रक्ताची सुरक्षित वाहतूक आणि शिबिरानंतरची अहवाल प्रणाली सुनिश्चित करावी लागेल. प्रत्येक रक्त केंद्राने ई-रक्तकोश पोर्टलवर रक्तसाठा आणि संबंधित माहिती दररोज अद्ययावत ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

या सर्वसमावेशक आदेशाद्वारे राज्यातील सर्व रक्त केंद्रांमध्ये एकसमान दर्जा, पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण, कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहेे.
- तुकाराम मुंढे, एफडीए आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news