

मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनासंदर्भात नौदल अधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने हयगय झाली असेल, तर नौदल अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल बुधवारी उच्च न्यायालयाने उपस्थित केला. या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आपण चाळीस लाखांची गुंतवणूक करून पुतळा तयार केल्याची माहिती जयदीप आपटेने न्यायालयाला दिली. तथापि, या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट होते, या सरकारी अहवालातील माहितीची जाणीव न्यायालयाने आपटे याला करून दिली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी नक डिसेंबरला निश्चित करण्यात आली आहे.