

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील मालाड पूर्व भागातील खडक पाडा फर्निचर मार्केटमध्ये आज (दि.२५) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या बारा गाड्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.